गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय आयोजित करण्यात आलेल्या मल्लखांब स्पर्धेचे उदघाटन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्म बी. ओ. एस. सदस्य बापूसाहेब समलेवाले व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व सिनेट सदस्य सुजित शेडगे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस.एम.कदम होते. तर निवड समितीचे चेअरमन प्रा. आण्णासो पाटील, सदस्य डॉ.सी.एच. गिरी यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली. प्रारंभी स्वागत प्रा. जयवंत पाटील यांनी केले व क्रीडा विभाग प्रमुख डॉ. राहुल मगदूम यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी मार्गदर्शन करताना शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त बापूसाहेब समलेवाले यांनी खेळाडूंनी खेळातून आपले करिअर घडविणे आवश्यक आहे, खेळाडूंना सध्या मिळत असलेल्या भौतिक सुविधांचा उपयोग करून घेऊन खेळातून आपले, कॉलेजचे, राज्य व देशाचे नांव उज्वल करावे तसेच खेळातून खिलाडूवृत्ती जोपासावी असे प्रतिपादन केले.ले प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी अध्यक्षीय भाषणातून शिवराज महाविद्यालय हे विविध स्पर्धांचे आयोजन करत असते त्याचबरोबर विविध स्पर्धांमध्ये उज्वल ठरत आहे. खेळाडूंनी आपला शारीरिक, बौद्धिक, मानसिक व सामाजिक या त्रिसूत्रींचा वापर करून आपला सर्वांगीण विकास साधने आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. या क्रीडा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे, शिवाजी विद्यापीठ क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर हॉलमध्ये संपन्न झालेल्या या उदघाटन कार्यक्रमास विविध महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक, खेळाडू उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गौरव पाटील यांनी केले तर आभार डॉ. गणेश सिंहासने यांनी मानले