गडहिंग्लज : शिवराज महाविद्यालयात एम. एस्सी. कॉम्प्यूटर सायन्स विभाग व सनपूर्णम इन्फोटेक प्रा. लि. यांच्या मध्ये व महाविद्यालयाच्या एम.ए. इंग्रजी विभाग व देवचंद कॉलेज अर्जुननगर इंग्रजी विभाग यांच्या मध्ये सामंजस्य करार करण्यात आला. एम.एस्सी. कॉम्प्यूटर सायन्स विभाग विद्यार्थ्यांना जॉब प्लेसमेंट व इंटर्नशिपसाठी हा सामंजस्य करार उपयोगाचा ठरणार आहे, या सामंजस्य करारप्रसंगी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांनी या सामंजस्य करारामुळे शिवराज महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाचे अद्यावत असे शिक्षण मिळणार आहे. शिवाय संगणक विभागाच्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी उपयोग होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून संस्थेच्या माध्यमातून या भागातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असे योगदान देण्यात यावे यासाठी संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम या सामंजस्य करारातून जपला आहे असे शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांनी व्यक्त केले. तसेच यावेळी सनपूर्णम इन्फोटेक प्रा.लि.चे सीईओ योगेश लोकुरकर, श्री राजू मुचंडी, शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, देवचंद कॉलेज अर्जुननगर इंग्रजी विभाग प्रमुख प्र.बी.जी.पाटील, एम.एस्सी. कॉम्प्यूटर सायन्स विभाग प्रमुख प्रा. सारिका शिंदे, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डी.यु.जाधव, प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. एन.जी. चव्हाण, प्रा. रोहन हत्ती, प्रा. विक्रम शिंदे आदी उपस्थित होते.