राजे समरजितसिंह घाटगे यांचा पाठपुरावा
गडहिंग्लज : महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियानांतर्गत गडहिंग्लज येथील ढोर समाजाच्या सदतीस कुटुंबीयांना मोफात नळ जोडणी मंजूर झाली होती.मात्र सुरक्षा ठेव भरण्याच्या कारणामुळे नळ जोडण्या केल्या नव्हत्या.गेली बारा वर्षे प्रलंबित असलेला हा प्रश्न अखेर आत्ता राजे समरजितसिंह घाटगे यांचे प्रयत्नातुन ढोर समाजाच्या नळ जोडणीचा प्रश्न मार्गी लागला. याबद्दल ढोर समाजाच्या वतीने राजे समरजितसिंह घाटगे यांचा सत्कार करुन आभार मानले.
मागील आठवड्यात गडहिंग्लज येथे राजे समरजितसिंह घाटगे यांनी घेतलेल्या जनता दरबारात ढोर समाजातील या कुटुंबीयांनी आपल्या नळ जोडण्या प्रलंबित असलेबाबत घाटगे यांच्याकडे कैफियत मांडली होती.त्यानंतर श्री घाटगे यांनी यामध्ये जातीने लक्ष घालून नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यामधील त्रुटी व अडचणी समजून घेतल्या. त्यानुसार महाराष्ट्र निर्मल सुजल अभियानांतर्गत अनुसूचित जाती यादीमध्ये या सर्वांची नावे समाविष्ट करून त्यांना मोफत कनेक्शन द्या. असे श्री घाटगे यांनी सुचविले. त्यानुसार त्यांची वरील योजनेत नावे समाविष्ट करून घेण्यास नगरपालिकेचे अधिकारी गंधमवाड यांनी मान्यता दिली. लवकरच त्यांना मोफत नवीन नळ जोडणी देवू असे सांगितले.
यावेळी ढोर समाजाच्या वतीने लाभार्थी जयश्री अशोक बिलावर यांच्या हस्ते श्री घाटगे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी लाभार्थी,वेंकटेश बिलावर, किसन बिलावर, सचिन बिलावर ,वासू बिलावर, अप्पासाहेब बिलावर ,विकास पाटील ,करंबळीचे सरपंच अनुप पाटील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तारळे, तालुका अध्यक्ष प्रीतम कापसे,वामन बिलावर अमर पोटे आदी उपस्थित होते.
छायाचित्र- गडहिंग्लज येथील ढोर समाजातील मोफत नळ जोडणीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याबद्दल समाजाच्या वतीने राजे समरजितसिंह घाटगे यांच्या सत्कारवेळी नागरिक