गडहिंग्लज : येथील संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन मलिग्रे (ता. आजरा) येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजरा कारखान्याचे माजी संचालक श्री सुरेश रेडेकर होते. तर शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे होते व मुंबई महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी श्री अशोक तर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांनी केले. या कार्यक्रमात शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे, मुंबई महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी श्री अशोक तहुँकर, माजी सरपंच व विद्यमान सदस्य श्री समीर पारदे, माजी सरपंच श्री अशोक शिंदे, श्री सुहास जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आजरा कारखान्याचे माजी संचालक श्री सुरेश रेडेकर यांनी अध्यक्षीय भाषण केले.
तंटामुक्त अध्यक्ष श्री संजय बुगडे, उपसरपंच सुरेखा तर्डेकर, ग्रा.पं. सदस्या कल्पना बुगडे, पोलीस पाटील मनोहर सावंत, रवळनाथ दुध संस्थेचे चेअरमन शिवाजी कागीनकर यांच्यासह गावातील ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. संजय कांबळे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.एम.एस.घस्ती, यांच्यासह स्वयंसेवक-स्वयंसेविका उपस्थित होते. प्रा. प्रियांका जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर आभार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. गीता देसाई यांनी मानले.
विशेष श्रमदानाचे उदघाटन सेवानिवृत्त पोलीस शंकर बाळू नेसरीकर, शिवाजी लक्ष्मण नेसरीकर यांच्या हस्ते करण्यात आले. या उदघाटनानंतर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक-स्वयंसेविकांनी गावातील शाळा, दवाखाना, हायस्कूल परिसर तसेच गावातील गल्ल्यांमधील स्वच्छता केली.