गडहिंग्लज : शिवराज महाविद्यालयात राज्यशास विभागाच्या वतीने भारतीय संविधान संवाद झाला. अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे होते. स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले यांनी केले, यावेळी प्रमुख अतिथी संविधान जागर समितीचे श्री अमोल पाटील यांनी भारतीय संविधानाबाबत मार्गदर्शन करताना आजच्या विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान समजून घेतले पाहिजे. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रीकेचे महत्व समजावून दिले.
संविधान जागर समितीचे श्री संग्राम सावंत यांनी भारत हा सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, गणराज्य आहे म्हणजे काय याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले शिवाय स्वातंत्र्य, समता व बंधुता आचार- विचार आणि भारतीय समाजातील विविधेतेचे महत्व सांगून भारतीय संविधान संवादाची आज का गरज आहे याविषयी मार्गदर्शन केले. शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून भारतीय संविधानाचे आताचे महत्व, आजच्या काळात संविधान संवादाची गरज का आहे याबाबत मार्गदर्शन केले. श्री राजवर्धन यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास यावेळी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिलराव कुराडे, प्राचार्य डॉ. एस.एम. कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमास प्रा.सौ. बिनादेवी कुराडे, नॅकचे समन्वयक प्रा. किशोर अदाटे, प्रा.एम.एस. घस्ती यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, एन.एस.एस.चे स्वयंसेवक, एन.सी.सी.चे कॅडेट, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. डॉ.ए.जी. हारदारे यांनी आभार मानले.