गडहिंग्लज : गडहिंग्लज चे लाखो भक्ताचे श्रध्दास्थान असणारे काळभैरी देवस्थान आहे. सदर या मंदिराची वर्षाकाठर यात्रेनिमित्त लाखो भाविक दर्शन घेतात. या वेळी या ठिकाणी सर्व ठिकाणी यात्रेमुळे लाईटचा झगमग असते.
परंतु परवाची गोष्ट रात्री फक्त ६:३० ते ७:३० दरम्यानची गोष्ट आहे. मुख्य रस्त्यापासून कमानीतून जुना रस्ता व पायरी मार्ग आहे. या ठिकाणी परगावचे भाविक रात्री दर्शनाला आले होते. ते अंधारात पुढे पुढे मोबाईलच्या मंद प्रकाशात सावकाश चालले होते, मी त्यांना भेटलो ते आस्थेने म्हणाले की तुम्ही इथले काय? मी होय म्हणालो ते म्हणाले 'मंदिर इतके प्रसिध्द व सुंदर आहे, मग रात्री लाईट का नाही" मला ही कसे तरी वाटले. माझ्याकडे कोणतेच उत्तर नव्हते.
हाच धागा पकडून आम्ही हे निवेदन देतो की, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटी, बडयाची वाडी ग्रामपंचायत व इतर भाविकांनी यामध्ये लक्ष घालून या ठिकाणी लाईटची सोय करून हा पायरी पथमार्ग प्रकाशित करावा जेणे करून संध्याकाळी येणाऱ्या भविकांना रस्ता दिसेल. तरी कृपया आमच्या या निवेदनावी लवकरात दखल घ्यावी व भाविकांची गैरसोय टाळावी.