गडहिंग्लज : समाजामध्ये सात्विक भाव निर्माण व्हावा, सामाजिक नितीमता वाढीस लागावी म्हणून संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम व सर्वच वारकरी संतानी कीर्तन, प्रवचन, पंढरीची वारी इत्यादी माध्यमाद्वारा प्रयत्न केले. संत नामदेवांनी तर नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लाऊ जगी अशी कीर्तन परंपरा समृद्ध केली. याच परंपरेचे पुनर्जागरण व्हावे म्हणून सारथी चोरटेबल ट्रस्ट व गडहिंग्लज तालुका वारकरी परिवार यांच्या वतीने सूर्या सांस्कृतिक भवन येथे वारकरी कीर्तन संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर संमेलनाचे उद्द्घाटक म्हणून शिवम प्रतीष्ठान धारेवाडी कराड चे मा. इंद्रजीत देशमूखसो हे लाभलेले आहेत. तर संमेलनाध्यक्ष म्हणून संत एकनाथ महाराज यांचे १४ वे वंशज ह.भ.प. श्रीगुरू योगीराज महाराज गोसावी हे लाभले आहेत. १ जानेवारी२०२४ रोजी खालील प्रमाणे कार्यक्रम संप्पन होतील.
सकाळी १०.०० - श्री. विठ्ठल मंदिर गडहिंग्लज ते सूर्या सांस्कृतिक भवन दिंडी सोहळा.
दुपारी १२ ते १२.३० - पालखी पूजन व दिंडी पूजन सोहळा.
दुपारी २ ते ३ प्रवचन श्री. इंद्रजीत देशमूखसो.
दुपारी ३ ते ३.४५ हरिपाठ.
दुपारी ३.४५ ते ४.३० - संत सन्मान सोहळा.
सायंकाळी ४.३० ते ६ - हरिकीर्तन ह.भ.प. श्रीगुरू योगीराज महाराज गोसावी.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून परमपूज्य गुरुवर्य किसन महाराज व ह.भ.प. भाऊसाहेब पाटील महाराज हे लाभले आहेत. या निमिताने कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रात कीर्तनाच्या द्वारा समाज प्रबोधन करणाऱ्या २६ वारकरी कीर्तनकार संतांचा सन्मान करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहून भक्ती सुखाचा आनंद घ्यावा, असे संयोजक चे संस्थापक यानी कळविले आहे.