आजरा : आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नूतन अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव धुरे यांची तर उपाध्यक्षपदी तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष एम. के. देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
निवडणुकीनंतर पदाधिकारी निवडीच्या पार्श्वभूमीवर पहिलीच संचालक मंडळाची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे यांच्या अध्यक्षतेखाली आज कारखाना कार्यस्थळी पार पडली. निवडीपूर्वी सर्व उमेदवारांच्या मुलाखतीनंतर निश्चित करण्यात आलेल्या व पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि प्रमुखांनी दिलेला बंद लखोटा खोलण्यात आला. यावेळी नेते मंडळींनी सुरुवातीला अध्यक्ष म्हणून वसंतराव धुरे व उपाध्यक्ष म्हणून एम. के. यांची निवड करण्याबाबतच्या सूचना केल्या होत्या. या सूचनेनुसार धुरे व देसाई यांची निवड करण्यात आली.
धुरे यांनी यापूर्वीही अध्यक्षपदाची धुरा चांगल्या पद्धतीने सांभाळलेली आहे. त्यांना अध्यक्षपदाचा अनुभव आहे, तर देसाई हे कारखान्यातील ज्येष्ठ संचालक आहेत. या दोघांना संधी देऊन प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्नही नेते मंडळींनी केल्याचे स्पष्ट होत आहे. या बैठकीपूर्वी कारखान्याच्या सर्व संचालकांना चाळोबा देव येथे फेटे बांधून एकत्रित रित्या बैठक स्थळी आणण्यात आले.
कारखाना सद्यस्थितीला अडचणीत असला तरीही वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार काटकसर पारदर्शक पद्धतीने कारखान्याचा कारभार केला जाईल. कर्जमुक्तीच्या दिशेने आवश्यक ते प्रयत्नही केले जातील असे निवडीनंतर बोलताना नूतन अध्यक्ष वसंतराव धरे यांनी सांगितले
कारखाना सद्यस्थितीला अडचणीत असला तरीही वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार काटकसर पारदर्शक पद्धतीने कारखान्याचा कारभार केला जाईल. कर्जमुक्तीच्या दिशेने आवश्यक ते प्रयत्नही केले जातील असे निवडीनंतर बोलताना नूतन अध्यक्ष वसंतराव धुरे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई
,संग्रामसिंह कुपेकर, दिगंबर देसाई, शिरीष देसाई,
नामदेव नार्वेकर, संभाजी तांबेकर, देवदास बोलके,
जनार्दन बामणे, राजू होलम, विक्रम देसाई, गणपतराव
सांगले, राजेंद्र देसाई, संचालक संभाजी पाटील, अशोक
तर्डेकर, रशिद पठाण, निसार दरवाजकर, यांच्यासह
कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक
व्यंकटेश ज्योती यांच्यासह अधिकारी वर्ग, नूतन
संचालकांचे समर्थक, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते
मोठ्या संख्येने उपस्थित होते.