सरवडे : बिद्री तालुका कागल येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या चौथा दिवस सर्वाधिक २३५ उमेदवारीनी ५८ दुबार अर्जासह तब्बल २९३ अर्ज भरले. आज अखेर एकूण १२७० अर्जाची विक्री झाली असून ५४२ उमेदवाराने १२३ दुबार अर्जासह एकूण ६६५ अर्ज निवडणूक विभागाकडे दाखल केली आहे.बुधवार दि. १ नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. आज अर्ज भरलेल्यांमध्ये कारखान्याचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, गोकूळचे संचालक आर. के. मोरे, कपिल खोराटे, भिकाजी एकल, राजेंद्र भाटळे, नेताजी पाटील, विद्यमान संचालक युवराज वारके, लहू जरग, अशोक फराकटे, बालाजी फराकटे, शीतल फराकटे, डी. एम. चौगले, केशवकाका पाटील, देवानंद पाटील, विकास पाटील, के. के. फराकटे, दत्तात्रय खराडे, पंडीतराव केणे, संचालक श्रीपती पाटील यांचा समावेश आहे.