गडहिंग्लज मध्ये गुरुवारी शिवसेनेतर्फे 'होऊ द्या चर्चा' कार्यक्रम

KolhapurLive


गडहिंग्लज : शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधण्यासाठी ' होऊ द्या चर्चा ' हा कार्यक्रम शाहू सभागृह हॉल, गडहिंग्लज नगरपरिषद मध्ये गुरुवार दि. ०५/१०/२०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता होणार आहे.
 या कार्यक्रमासाठी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख कोल्हापूर सुनिल शिंत्रे, माजी आमदार संजयबाबा घाटगे, विद्याताई होडे, चंदगड विधानसभा संपर्क प्रमुख अशोक निकम, कागल विधानसभा संपर्क प्रमुख दिनकर जाधव, उपजिल्हा संघटक संभाजी पाटील, उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर, संभाजी भोकरे, प्रकाश पाटील, तालुका प्रमुख शिवगोंड पाटील, लक्ष्मन मनवाडकर, अनिल दळवी, युवराज पोवार, राजू सावंत, शहर प्रमुख संतोष चिकोडे, महिला जिल्हा संघटिका ग्रामीण शांता जाधव, महिला शहर संघटिका रेखा पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख अवधूत पाटील, रियाज शामनजी आदी मान्यवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधणार आहेत. तरी या कार्यक्रमास तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका प्रमुख दिलीप माने यांनी केले आहे.