गडहिंग्लज : येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. शहर अध्यक्ष श्री बसवराज आजरी यांच्या हस्ते प्रांत कार्यालयाजवळील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अडव्होकेट दिग्विजय कुराडे, सोमगोंडा देसाई, दयानंद परीट, शामराव मोरे, प्रथमेश नाईक, विनीत घुगरे, रोशन पाटील, अभिजित भाटले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.