आजरा तालुक्यातील वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करणेबाबत...

KolhapurLive
गडहिंग्लज : आम्ही शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वतीने आपणास निवेदन करतो की गेली अनेक वर्षे आजरा, चंदगड तालुक्यातील हत्ती, गवे व अन्य प्राण्यांचा उपद्रव चालु आहे. यामध्ये गव्यांच्या हल्यात अनेक शेतक-यांना आपला जिव गमवावा लागला तसेच परवा दि. २८/१०/२०२३ रोजी आजरा तालुक्यातील घाटकरवाडी येथे हत्तीच्या हल्यात एका वन कर्मचा-याचा मृत्यू झाला. तरी देखील अजुनही हत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल आपल्या विभागाकडून झालेले नाही. तसेच शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान वन्यप्राणांमुळे होत आहे व त्यात आपल्याकडून मिळणारी नुकसान भरपाई तुटपुंजी आहे. या सर्व बाबींमुळे आजरा, चंदगड तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे. या सर्व बाबींचा विचार करता आम्ही खालील मागण्या आपल्याकडे मागत आहोत.