कोजागिरी पौर्णिमेनिमित्त..... बहरली शिवराज महाविद्यालयात रंग सुरांची मैफिल....

KolhapurLive
गडहिंग्लज : शिवराज महाविद्यालय व आमन युथ सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'सुरसंगम' बहारदार कार्यक्रमात पौर्णिमच्या टिपूर मन मोहून टाकणारी [बहारदार से कॉकटेल गीतांची नजाकत, डान्सचा जलवा या सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगत कोजागिरीच्या शीतल बाद बहरली. या कार्यक्रमाचे उदघाटन उद्योजक प्रकाश शहा यांच्या हस्ते करण्यात आले.

महाविद्यालयाचा अर्णव बुवा यांनी गायलेल्या 'दिल कि ती... या उपशास्त्रीय संगीतकार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. हार्मोनियम निमेश देवाडे यांनी व कार्तिक सुतार यांनी तबला साथ दिली. डॉ सदानंद पाटणे यांनी आपल्या गायनातून 'मॉस्कॉन कोल्हापूरी झलक पेश केली. गायक रविकिरण देवी यांनी जादू तेरी नजर. डॉ. समीधा चौगुले व सलीम यांनी गोमू संगतीने तुझ्या मी येणार हाय... दर्जी भाई यांनी मेरा बाद आया है नजर हबीब मकानदार यांनी 'दर्द ये दिल दर्द ये जिगर जिसने जगाया... सुप्रिया यांनी ये रंगीले मी जादू किया... सलीम व आरती पट्टणशेट्टी 'चांद छुपा बादल मे हारूण पटेल यांनी मनाच्या धुंदीत लहरीत ये ना हे गीत सादर केले. यांसह अन्य कलाकारांनी गायिलेल्या जुन्या-नव्या मराठी हिंदी गीतांमधून कार्यक्रमात सुरेलता आणली, श्रावणी शिंदेचा व शिवराज इंग्लिश मेडियम स्कूल व बी.एस्सी भाग दोनच्या विद्यार्थिनींचा रिमिक्स डान्स, मनोज ठाकूर यांनी साऊथ इंडियन, सानिका सावरे यांनी 'चंद्रा' नृत्याविष्काराची झलक रसिकांची दाद मिळविली. डॉ.बी.एम. जाधव यांनी महान कलाकार दादा कोंडके, निळू फुले, नाना पाटेकर, गणपत पाटील यासह विविध कलाकार व राजकीय नेते शरद पवार, लालूप्रसाद यादव यासह मिमिक्री सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. शिवराज इंग्लिश मेडियम स्कूलच्या विद्यार्थिनीनी सादर केलेल्या विविध पारंपारिक नृत्यासह कॉकटेल गीतांची नजाकत सर्वांनाच मंत्रमुग्ध करणारी होती.

यावेळी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी शिवराज विद्या संकुलाने सांस्कृतिक कार्यक्रमाची परंपरा कोजागिरीच्या माध्यमातून आम्ही जपली आहे. ही पर्वणी उपलब्ध करून विद्यार्थी व कलाकारांना प्रोत्साहन देत आहे. अशा कार्यक्रमातून कलाकारांच्या कलेला संधी देऊन कोजागिरी साजरी केली जात आहे. शिवराज विद्या संकुलाचे संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जपल्या जाणान्या या सांस्कृतिक परंपरेची पर्वणी खरोखरच कौतुकास्पद असल्याचे स्पष्ट करून शिवराज विद्या संकुलाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्याची प्रेरणा घेऊन आम्ही असे सांस्कृतिक उपक्रम राबवून या भागातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून संधी देत आहोत असे सांगितले.

या कार्यक्रमास जि.प.सदस्य अॅड. हेमंत कोलेकर, डॉ. सदानंद पाटणे, अमन युध सर्कलचे हबीब मकानदार, संस्थेचे उपाध्यक्ष श्री के.जी. पाटील, संस्थेचे बसवराज आजरी, श्री बाळ पोटे-पाटील, अँड सवाजीराव पाटील, श्री दीपक मांगले, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, गोडसाखरच्या संचालिका आरबोळे मॅडम, पाटील मॅडम, रेखा पोतदार, शारदा आजरी, स्वाती मडलगी, प्रा. सौ. बिनादेवी कुराडे, राजू मांडेकर, प्रा. विश्वजित कुराडे, शिवराज इंग्लिश मेडियमच्या मुख्याध्यापिका गौरी शिंदे व अन्य मान्यवर, प्राध्यापक प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनीव परिसरातील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन पर्यवेक्षक प्रातानाजी चौगुले, एमएसस्ती संतोष पाटील यानी केले सुत्रसंचालन प्राती पाटील व शिवराज इंग्लिश मेडियम स्कूलची विद्यार्थिनी कु. अमरीन मुल्ला यांनी केले.