शिवराज महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

KolhapurLive

गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे होते. सचिव डॉ. अनिल कुराडे व प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रारंभी स्वागत रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ए. एम. हसुरे यांनी केले. यावेळी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी व राजर्षी शाहू महाराज यांच्या डिजिटल छायाचित्रांचे अनावरणही अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमात डॉ. अल्ताफ हुसेन नाईकवाडे यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांचा जागर संपूर्ण जगभर आजही सुरु आहे. भारताने महात्मा गांधीजी ही जगाला अनमोल अशी देणगी दिली आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन वाटचाल करणे गरजेचे आहे. आजही जगभर महात्मा गांधी यांनी लिहिलेली व त्यांच्या चरित्रावर आधारित पुस्तके मोठ्या प्रमाणात वाचली जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महात्मा गांधीजींच्या विविध पैलूंचा आढावा आपल्या भाषणातून घेतला. नॅक समन्वयक प्रा. किशोर अदाटे, ग्रंथपाल संदीप कुराडे, पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले, प्रा. आझाद पटेल, डॉ. श्रद्धा पाटील यांच्यासह अन्य प्राध्यापक, प्रशासकीय सेवक उपस्थित होते. आभार डॉ. प्रवीण डोंगरे यांनी मानले.