शिवराज महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन

KolhapurLive


गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती' राष्ट्रीय एकता दिन' व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. प्रारंभी सरदार वल्लभभाई पटेल व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. एस.एम.कदम, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. सुधीर मुंज यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक डॉ. ए.जी. हारदारे यांनी केले. राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एन. आर. कोल्हापुरे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे जीवनकार्य स सांगून आपला भारत एकसंघ ठेवण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान मोलाचे असल्याचे स्पष्ट केले. यावेळी प्रा प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी आपल्या मार्गदर्शनातून या थोर विभूतींना अभिवादन करून सर्वांना भ्रष्टाचार मुक्तीसाठी शपथ दिली. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे, डॉ. एस. डी. सावंत, प्रा. आझाद पटेल, डॉ.आर.पी. हेंडगे, प्रा. सुशांत पांगम यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी- विविद्यार्थिनी उपस्थित होते. पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले यांनी आभार मानले.