डॉ. घाळी मध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा

KolhapurLive

गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी कॉलेज,मराठी विभाग यांच्या वतीने वाचन प्रेरणा दिन साजरा झाला. प्रभारी प्राचार्य डॉ. एस. एस. मस्ती अध्यक्षस्थान होते. डॉ. दत्ता पाटील यांनी मार्गदर्शन केले. डॉ. निलेश शेळके यांनी स्वागत केले. निबंध लेखन, स्वरचित काव्यवाचन स्पर्धा झाली. सहसचिव गजेंद्र बंदी यांच्या हस्ते विजेत्यांना समानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तेजस्विनी आळगुंडी, तृप्ती सुतार यांनी वाचण्याचे महत्त्व यावर विचार मांडले.यावेळी एस ए आरबोळे,सरोज बिडकर, आर. बी. पोरे, विलास प्रधान, प्रीती देसाई व प्राध्यापक उपस्थित होते. स्नेहल गवळी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. वंदना खोराटे यांनी आभार मानले.