शिवराज महाविद्यालयात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

KolhapurLive

गडहिंग्लज : महिलांनी कोणतेही काम प्रामाणिकपणे करणे आवश्यक आहे. जीवनात प्रयत्नाशिवाय काहीच मिळू शकत नाही. जीवनात प्रयत्नाला संघर्ष आहे. परंतु संघर्षांतून मिळणारे यश हे नेहमीच प्रेरणादायी ठरते आहे. आज श्रीया या सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्यांच्याकडून उत्तम व्यवस्थापन होऊ शकते ज्या महिला उत्तम समन्वय साधून पुढे जातात त्याच महिला जीवनात यशस्वी होतात असे प्रतिपादन डी. आर. माने कॉलेज कागल येथील प्रा. हसीना अब्दुलअजीज मालदार यांनी केले. येथील शिवराज महाविद्यालय व शिवराज फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवदुर्गा अभिवादन महोत्सवात 'कर्तृत्ववान महिलांचा सन्मान' या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सुकन्या युध फेस्टिवलच्या प्रमुख प्रा. सौ. बिनादेवी कुराडे होत्या. तर संस्थेचे उपाध्यक्ष अँड. दिग्विजय कुराडे, सामाजिक कार्यकर्त्या रेखा पोतदार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी बजावणाऱ्या कर्तृत्ववान महिला मुख्याध्यापिका ललितागौरी इंगवले, शिक्षिका पदमश्री गुरव, आरोग्य अधिकारी डॉ. नीलिमा धबाले, आर. टी. ऑफिसर हिनाकौसर सौदागर, प्रगतशील शेतकरी सुरेखा शेगुनशी, व्यावसायिक कृष्णाबाई नरसगोंडा पाटील, सामाजिक कार्यकर्त्यां इंदुबाई भदरगे, खेळाडू सृष्टी रेडेकर आदींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक उपाध्यक्ष अँड. दिग्विजय कुराडे यांनी केले.

यावेळी मुख्याध्यापिका ललितागौरी इंगवले यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये म्हणाल्या आपले जीवन सुंदर आहे. ते कर्तृत्वातून सिद्ध करण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. महिलांनी या दोन कुटुंबामध्ये समन्वय ठेवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिवाय आपले आई-वडील, गुरुवर्य, आपला समाज आणि देश यांचे भान ठेऊन नेहमीच कार्यरत राहण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. सौ. बिनादेवी कुराडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून आज नारीशक्तीचा जो सन्मान होत आहे. आजच्या पिढीला प्रेरणा देणारा आहे. समाजात कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी महिला नेहमीच प्रयत्नशील ठरत आहे. त्यांचा सन्मान होणे आवश्यक आहे. तरच नव्या पिढीला समाजशील कार्याचे महत्व कळेल आणि त्याची जाणीव होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी कृष्णाबाई पाटील, सुरेखा शेगुनशी, डॉ. नीलिमा घमाले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी प्रा. पौर्णिमा कुराडे, प्रा.आशा पाटील, प्रा.रवी खोत, सौ.सीमा आजरी. सन्मानीय मान्यवरांचे कुटुंबीय, यांच्यासह अन्य मान्यवर, महिला प्राध्यापक, प्रशासकीय महिला सेवकवर्ग व विद्यार्थीनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रियांका जाधव व प्रा. गीतादेवी देसाई यांनी केले तर आभार प्रा. डॉ. श्रद्धा पाटील यांनी मानले.