कागलमध्ये सफाई कर्मचाऱ्यांसमवेत मंत्री हसन मुश्रीफ यांनी हाती घेतला झाडू

KolhapurLive
कागल, दि. : कागलमध्ये नगरपालिकेच्या स्वच्छता सप्ताहाचा प्रारंभ झाला. वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला. नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसमवेत मंत्री श्री. मुश्रीफ यांनीही हाती झाडू घेऊन शहरातील ऐतिहासिक गैबी चौकातून मुख्य बाजारपेठेत साफसफाई केली.
            
स्वच्छता मोहिमेच्या सुरुवातीला उपस्थित सर्वांनी गैबी चौकात वैयक्तिक स्वच्छता व साफसफाईसह सार्वजनिक स्वच्छता व साफसफाईची सामुदायिक शपथ घेतली.   
           
या मोहिमेत केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप माने यांच्यासह पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम पवार, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, नगरसेवक प्रवीण काळबर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय चितारी, सागर दावने, नगरसेवक विवेक कांबळे लोटे, रणजीत बन्ने, अस्लम मुजावर, इरफान मुजावर यांच्यासह प्रमुख मान्यवर व नागरीकही सहभागी झाले होते.