कोळिंद्रेच्या हनुमान सेवा संस्थेत मायक्रो एटीएमचे उद्घाटन

KolhapurLive

किणे : कोळिंद्रे येथील हनुमान विकास सेवा संस्थेमध्ये मायक्रो एटीएमचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन सुरेश सावंत होते. यावेळी जिल्हा बँकेचे निरीक्षक विजय कुंभार यांनी बँकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची माहिती खातेदारांना दिली. कार्यक्रमाला किणे शाखा निरीक्षक विजय सरदेसाई, बँकेचे शाखाधिकारी विजय कांबळे यांच्यासह संस्थेचे संचालक सुभाष सावंत, संतराम कुराडे, गणपत पाटील, बाबू पाटील, तुकाराम जाधव उपस्थित होते. संचालक रमेश बुगडे यांनी आभार मानले.