कागणीत मधमाशांच्या हल्ल्यात गाईचा मृत्यू तर दोघे जखमी

KolhapurLive

कोवाड : कागणी (ता. चंदगड) येथील विश्वनाथ कलाप्पा देसाई यांच्या गाईचा मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी वारी नावाच्या शेतात ही घटना घडली. प्रवीण परशराम देसाई व ओमकार विश्वनाथ देसाई हे दोघे आपल्या जनावरांसह शेतात गेले होते. मात्र घारीने उठवलेल्या मधमाशांनी ओमकार व प्रवीण यांचावर हल्ला केला. यात हे दोघे जखमी झाले. यावेळी गाईवर ही मधमाशांनी हल्ला सा केला. यात ओमकार व प्रवीणची परिस्थिती सुधारली तर गाईचा रविवारी दुपारी मृत्यू झाला...