शिवराज महाविद्यालयात कौशल्य आणि उद्योजकता विकास केंद्राची स्थापना

KolhapurLive

गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित कौशल्य आणि उद्योजकता विकास कार्यशाळा संपन्न झाली. यावळी कौशल्य आणि उद्योजकता विकास केंद्राची स्थापना करण्यात आली. या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील कौशल्य आणि उद्योजकता विकास केंद्राचे संचालक डॉ. आर. जी. पवार व कौशल्य विकास अधिकारी प्रा. प्रमोद कांबळे तर शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते. उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक प्रा. दीपक खेडकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. महेश चौगुले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

यावेळी कौशल्य आणि उद्योजकता विकास केंद्राचे संचालक डॉ. आर. जी. पवार यांनी कौशल्यावर आधारित शिक्षणाची आज अत्यंत गरज आहे. त्यासाठी विविध कोर्स उपलब्ध आहेत याचा लाभ विद्याथ्र्यांनी वेळीच घेणे काळाची गरज आहे. ट्रॅव्हल अँड टुरिझम, इंट्रोडक्शन टू इन्कम टॅक्स, टॅली योगा, रोपवाटिका उद्यान कौशल्य अभ्यासक्रम, रेडीओ जॉकी, ड्रेस डिझाईन, इन्हेंट मॅनेजमेंट हिरास रोखे बझार, आदी अभ्यासक्रमाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रा. प्रमोद कांबळे यांनी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत प्रक्रिया उद्योगासाठी २५ लाख तर सेवा उद्योगासाठी कमाल १० लाख रुपयांचे बीजभांडवल उपलब्ध करून दिले जाते तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत प्रक्रिया व निर्मितीसाठी ५० लाख तर सेवा उद्योगासाठी कमाल २० लाख रुपयांचे श्रीजभांडवल उपलब्ध करून दिले जाते शिवाय बेरोजगारांना बीजभांडवल २५ लाखापर्यंतचे कर्जाची सोय आहे तरी याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी सचिव डॉ. अनिलराव कुराडे व प्राचार्य डॉ. एस. एम.कदम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. सुधीर मुंज, प्रा. बियामा वाटंगी, डॉ. बी. एम. जाधव, वाणिज्य विभागाचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. आभार डॉ. महेश चौगुले यांनी मानले.