गडहिंग्लज- आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा चंदगड विधानसभा मतदारसंघात फडकला पाहिजे, यासाठी गावोगावी पक्षाच्या शाखा उघडून संघटना बळकट करा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांनी केले. गडहिंग्लज येथे संपर्क कार्यालयात कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते, यावेळी संपर्कप्रमुख अशोक निकम, कोल्हापूर जिल्हा महिला संपर्कप्रमुख भारती शिंगटे प्रमुख उपस्थित होते.
होऊ द्या चर्चा या पक्षीय ध्येय धोरणानुसार गुरुवारी आजरा, गडहिंग्लज, चंदगड येथील शिवसेना युवा सेना पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा झाला यावेळी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अशोक निकम म्हणाले 1 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पातळीवरती कार्यक्रम राबवून सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र आणण्याचे काम करावे. आगामी काळामध्ये राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पोकळ घोषणांचा भांडाफोड करून त्यांना उघडे पाडा आणि शिवसेनेला बळकट करा.
महिला आघाडी संपर्कप्रमुख भारतीय शिंगटे म्हणाल्या महिला आघाडीने एक पाऊल पुढे टाकत ताकतीने अन्यायाविरुद्ध आवाज उठविला पाहिजे आगामी काळामध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघात महिलांची ताकद निर्णायक असेल त्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करा.
सुनील शिंत्रे म्हणाले पक्ष संघटना बळकट करण्यासाठी गावोगावी शाखा उघडणे हे आमचे ध्येय आहे. गावोगावी किती शाखा आहेत किती पदाधिकारी सक्रिय आहेत, किती पदे रिक्त आहेत याची तालुका प्रमुखाने वेळेत माहिती द्यावी. महिला आघाडीने पुर्नस्थापना करून महिला संघटना ताकतीने कार्यरत करावी.
यावेळी तालुकाप्रमुख युवराज पवार, अनिल दळवी, लक्ष्मण मनवडकर, रियाज शमनजी, वसंत नाईक, विनोद पाटील, उदय मंडलिक, सुनिल डोंगरे, मलिकार्जुन चौगुले, राजु रामजी, संभाजी येडुरकर, राचय्या स्वामी, युवराज पाटणे, तुकाराम पेडणेकर, भाऊसाहेब पडवळे, राजु डोंगरे तसेच युवासेनेचे अवधुत पाटील, कृष्णा पाटील, प्रतिक क्षिरसागर महिला आघाडीचे श्रध्दा शिंत्रे उपस्थित होते. गडहिंग्लज तालुकाप्रमुख दिलीप माने यांनी प्रास्ताविक केले. तर आभार शांता जाधव यांनी मांडले.