शिवराज महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन

KolhapurLive

गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे होते. प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रंथपाल श्री संदीप कुराडे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकातून कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जीवन व कार्य याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. एस.एम. कदम यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचे जे रोपटे लावले होते. त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. त्यांनी ग्रामीण शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी स्वत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बहुजनांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. समाजाला न्याय देण्याचे त्यांचे हे त्यागी कार्य सर्वांना प्रेरणा देणारे आहे असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमास श्री कुमार कुंभार, श्री नेताजी कांबळे, श्री अशोक पोवार, श्री राजू जाधव, श्री किरण सूर्यवंशी, आप्पाजी सावंत, श्री व्ही. आर. टेंबरे, सौ.सविता निकम, श्री मानसिंग यादव, यांच्यासह प्रशासकीय सेवक उपस्थित होते. शेवटी आभार श्री संतोष पाटील यांनी मानले.