माहितीचा अधिकाराचा चांगल्या हेतूने वापर करणे आवश्यक

KolhapurLive

गडहिंग्लज : माहितीचा अधिकार एक दुधारी शास्त्र असून त्याचा चांगल्या हेतूने वापर करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन तहसीलदार श्री ऋषिकेत शेळके यांनी केले. शिवराज महाविद्यालयातील समाजशास्त्र व राज्यशास्त्र विभाग आणि महाराष्ट्र शासनाचा महसूल व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय माहितीचा अधिकार दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. एस. एम. कदम होते तर प्रमुख उपस्थिती संस्थेचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांची लाभली. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले यांनी केले. यावेळी दर्शन करतारा तहसीलदार श्री शेळके यांनी माहिती अधिकार कायद्यामुळे प्रशासन येते शिवाय आपल्यावरील अन्यायाचे निवारण करण्यासाठी नागरिकांना त्याचा उपयोग होती परिणामी सुशासन निर्माण होऊन लोकशाहीकरण होत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी माहितीच्या अ संबंधित सर्व संज्ञा माहिती अधिकार कायद्याचे स्वरूप व उद्दिष्टे पार्श्वभूमी, अमलबजावणी करणारी यंत्रणा त्याचबरोबर या अधिकाराचा वापर करताना नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी आदीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. संस्थासचिव डॉ. अनिलराव कुराडे यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करताना नागरिकांनी अधिकारासोबत कर्तव्याची देखील जाणीव ठेवली पाहिजे असे मत मांडले. प्राचार्य डी. एस. एम. कदम यांनीही माहितीच्या अधिकारासंदर्भात बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी 'आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन' या विषयावर भित्तीपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते केले.

या कार्यक्रमास नायब तहसीलदार श्री. विष्णू मुटे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी- विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. आर. पी. हेंडगे यांनी केले