शिवराज कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त जनजागृती रॅली

KolhapurLive

गडहिंग्लज : येथील शिवराज कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून संपूर्ण शहरातून रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये 'निसर्गोपचार', 'अवयवदान', रोगराई, तसेच औषधांचा वापर याबाबत जनजागृती करण्यात आली. प्रा. मनीषा जाधव यांनी स्वागत करून प्रास्ताविकातून जागतिक फार्मासिस्ट दिनाचे महत्व सांगितले. औषधनिर्माता हा आरोग्य क्षेत्रातील अविभाज्य घटक आहे आणि त्याचा सन्मान करण्यकरीता या रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे प्राचार्य, डॉ. राहुल जाधव यांनी यावेळी सांगितले. यावेळी गडहिंग्लज शहरातून विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी प्रभात फेरी काढून शहरातील फार्मसिस्टचा गौरव केला. या प्रभात फेरीचे उदघाटन शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपाध्यक्ष जे. वाय. बारदेश्वर, संचालक श्री नंदनवाडे गुरुजी, संचालक विश्वजित कुराडे, प्राचार्य डी. राहुल जाधव तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.