शिवराज महाविद्यालयात 'श्रावणधारा काव्यवाचन'कार्यक्रम संपन्न

KolhapurLive


गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्यावतीने आयोजित श्रावणधारा काव्यवाचन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम तर प्रमुख अतिथी म्हणून कवियत्री सौ. रेखा पोतदार, प्रा. सौ. बिनादेवी कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रारंभी मराठी विभागप्रमुख डॉ. मनमोहन राजे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला.

या कार्यक्रमात प्रमुख कवियत्री रेखा पोतदार यांनी आपल्या 'तू मी आणि पाऊस' कवितेतून पावसाची सोबत मानला किती आनंद देणारी आहे. या पावसातील सफर मनाला मोहरून टाकणारी • आहे. पावसातल्या आनंददायी आठवणी त्यांनी कवितेतून व्यक्त केल्या. यावेळी प्रा. सौ. बिनादेवी कुराडे यांनी कवितेतून निसर्गाची साथ किती मोलाची ठरते आहे. निसर्गातून आपलेपण व्यक्त करणारी एमिली डिकीन्सन यांची कविता सादर केली. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम आपल्या अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यामधील सुप्तगुणांना वाव देण्यासाठी काव्यवाचन सारखे उपक्रम महाविद्यालयात राबविण्यात येत आहेत. या काव्यवाचनातून नवोदितांना व्यासपीठ मिळते आहे. यातून नवकवी निर्माण व्हावेत आणि त्यांनी आपल्या काव्याचा अविष्कार घडवावा हा उदात्त हेतू कार्यक्रमातून जपला •असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी रानकवी कविवर्य ना. धों. महानोर यांना डॉ. अशोक मोरमारे यांनी महानोर यांच्या कवितेचे वाचन करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. सुधीर मुंज, श्री अनिल कलकुटकी, विद्यार्थी ऋतुजा कानडे, अमृता सागर, सोनाली गवळी, रोहिणी जाधव, प्रतीक्षा धनवडे, जिज्ञासा जावळे, यश घोडके, दिपाली कांबळे, मनोज ठाकूर, देवयानी खोत, श्रेया पाटील, पौर्णिमा कुंभार, श्रेया झुटाळ, सुशांत कलगोंडा यांनी काव्यवाचन केले. या काव्यवाचनामध्ये नामवंत कवींच्या कवितांचा व स्वलिखित कवितांचा समावेश होता.

यावेळी पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले, प्रा. पर्णिमा कुराडे, डॉ. श्रद्धा पाटील, डॉ. एस. डी. सावंत, डॉ. जी. जी. गायकवाड, प्रा. प्राजक्ता बालेशगोळ, प्रा. लोहिता माने यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. डॉ.अशोक मोरमारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार डॉ. आनंदा कुंभार यांनी मानले.