शिवराज महाविद्यालयात 'चांद्रयान ३' या मोहिमेचे लाईव्ह प्रक्षेपण

KolhapurLive

गडहिंग्लज :

येथील शिवराज महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागाच्यावतीने 'चांद्रयान ३" या मोहिमेचे लाईव्ह प्रक्षेपण दाखविण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे माजी भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. बी. एम. कुलकर्णी यांनी 'चांद्रयान ३' या मोहिमेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले, हे 'चांद्रयान 3' 'इस्रो' च्या शास्त्रज्ञांनी अत्यंत महत्वपूर्ण अभ्यास करून आठ टप्यांमधून कसे यशस्वी होणार याबाबत त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती लाईव्ह प्रक्षेपणापूर्वी दिली. यावेळी त्यांनी चांद्रयान एक, दोन मधील फरक स्पष्ट करून 'चांद्रयान 3' हे यशस्वी होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा वापर केला जातो याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे 'चांद्रयान 3' सुरक्षित चंद्रावर उतरत असण्याची प्रक्रिया सर्वांना व्यवस्थितरित्या अनुभवली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अँड. दिग्विजय कुराडे यांनी ही चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्याबद्दल सर्व 'इस्रो' च्या शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयत्नाला खऱ्याअर्थी यश मिळाले आहे यावेळी सर्व शास्त्रज्ञांचे त्यांनी अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी भारताने ही मोहीम यशस्वी करून संपूर्ण जगात आपले कर्तृत्व सिद्द केले आहे. अनेक शास्त्रज्ञांनी या संशोधनासाठी दिलेले महत्वपूर्ण योगदान मोलाचे ठरले असल्याचे सांगून शास्त्रज्ञांच्या सामुहिक प्रयत्नाला खऱ्याअर्थी यश प्राप्ती होते असे सांगून त्यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. यावेळी माजी विद्यार्थिनी रेखा पोतदार, श्री राजू कुलकर्णी, श्री शामराव मोरे, श्री जावळे, केमिस्ट्री विभाग प्रमुख डॉ. ए. एम. हसुरे, पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय सेवक विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमात स्वागत प्रा. प्रवीण सरनोबत यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे तांत्रिक नियोजन प्रा. सुशांत पांगम, प्रा. रेवती राजाराम आणि प्रा. तेजस्विनी शिंदे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. प्रवीण गंदुगडे यांनी केले तर आभार डॉ. विजय सावंत यांनी मानले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी भौतिकशास्त्र विभागाने परिश्रम घेतले.