कडगावात पहिलेच नेत्रदान

KolhapurLive


_कडगाव (ता. गडहिंग्लज) येथील *लिलावती बसगोंडा पाटील यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. कडगाव गावातील हे पहिलेच तर चळवळीतील ९४ वे नेत्रदान आहे._
दै. पुण्यनगरीचे प्रतिनिधी प्रदीप पाटील यांच्या त्या आई होत्या.

गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील मधुकर दत्तात्रय मुळे यांचे मंगळवारी मरणोत्तर नेत्रदान झाले होते. आज सलग दुसऱ्या दिवशी कडगाव येथे नेत्रदान झाले. दोन्ही गावात प्रथमच नेत्रदान झालेली आहेत, हे विशेष. मोठ्या गावात नेत्रदान होऊ लागल्याने चळवळीची व्याप्ती वाढत आहे.