गडहिंग्लज : येथील इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह एज्युकेशन संचलित क्रिएटिव्ह हायस्कूल व ज्यु. कॉलेजमध्ये कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला.यावेळी कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांना अभिवादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव आण्णासाहेब बेळगुद्री होते, तर मुख्याध्यापक दिनकर रायकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांना कारगिल विजय दिनाचे महत्त्व सांगण्यात आले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.