गडहिंग्लज : बेकनाळ ते गडहिंग्लज सकाळी आणि त्यानंतर गडहिंग्लज आणि बेकनाळ या मार्गावर शुक्रवारपर्यंत गडहिंग्लज आगाराने बस सुरू करावी, अन्यथा शनिवारी सकाळी गडहिंग्लज- कडगाव रास्ता रोको छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. भाजपचे माजी अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी सदर निवेदन दिले आहे. बेकनाळहून गडहिंग्लजला येणाऱ्या महाविद्यालयीन
युवकांची मोठी संख्या आहे. त्यामुळे या मार्गावर सकाळी ७ वाजता बस मार्गावर सुरू करावी असे निवेदन दिले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने हा इशारा दिला आहे. सकाळी ७ वाजता कडगाव-बेकनाळ मार्गे गडहिंग्लज आणि ११.३० वाजता गडहिंग्लज बेकनाळ मार्गे कडगाव अशा एसटीच्या फेऱ्या तातडीने सुरू करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.