गडहिंग्लज : शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांचा ६३ वा वाढदिवस गडहिंग्लज शहर व तालुका शिवप्रेमीच्या वतीने विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. उद्धवजी नेहमी समाजाला काही ना काही देण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचप्रमाणे शिवसेना सहसंपर्क प्रमुख मा. सुनील शिंत्रे तालुका प्रमुख दिलीप माने यांनी शहरातील लोकांना आभा कार्ड हेल्थ कार्ड नवीन मतदार नोंदणी मोफत काढून देण्याचे आयोजन केले. तसेच उपजिह्वा रुग्णालय मधील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. प्रा. सुनिल शिंत्रे यांच्या माध्यमातून ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता वृत्तप्रत वाटप करणाऱ्या विक्रेत्यांना पाच लाख रुपयांचे विमा पॉलिसीचे वाटप करण्यात आले...
यावेळी संभाजी पाटील, संतोष चिकोडे, लक्षमन मनवाडकर, अवधूत पाटील, प्रतीक क्षीरसागर, काशिनाथ गडकरी, दिगंबर पाटील, संदीप कुराडे, तुकाराम पेडणेकर, राजू डोंगरे, संदीप पारिट, वसंत नाईक, सुरेश हेब्बळे, बाळासाहेब कडुकर, तेजस घेवडे, राजू पाटील व शिवसेना • पधादिकारी उपस्तिथ होते.