गडहिंग्लज : येथील शिवराज महाविदयालयात सुरू असलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांची गट चर्चा उत्साहात पार पडली
या उपक्रमात सुमारे दोनशे विद्यार्थी गटाने सहभागी झाले होते.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह साजरा होत आहे. आज दि 28 जुलै रोजी गटचर्चा हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात सर्व शाखा व विभागाचे विदयार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या विविध पैलूवर आपली मते व्यक्त केली. त्यामध्ये मल्टीपल एक्झिट मल्टीपल इंट्री, अॅकॅडमिक बैंक ऑफ क्रेडिटस, कौशल्य विकास, शैक्षणिक आराखडा यांसह अनेक विषयावर गट चर्चा झाली.
या उपक्रमाचे आयोजन वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डी. पी. खेडकर यांनी केले. गट चर्चेचे संयोजन ग्रंथपाल श्री संदीप कुराडे यांनी केले. गटचर्चेमध्ये विद्यार्थ्यांच्या शंकेचे निरसन आय. क्यू. ए. सी. चे समन्वयक प्रा. किशोर अदाटे, प्रा. डी. यु. जाधव यांनी केले. यावेळी संस्था सचिव डॉ. अनिल कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. ए. एम. हसूरे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन मोरमारे यांनी केले.