गडहिंग्लज : या शहरामध्ये गेल्या चार दिवसापूर्वी संतोष शिंदे या युवा उधोजकने आपल्या पत्नी व मुलासह केलेली आत्महत्या ही शहराला हादरून टाकणारी घटना होती. संतोष शिंदे याने अल्पावधीतच उद्योग क्षेत्रामध्ये मोठी भरारी घेतली होती. आपल्या दानशूर स्वभावामुळे गडहिंग्लज परिसरामध्ये त्याची एक ओळख होती. कोरोना महामारीच्या काळामध्ये त्याने केलेले कार्य हे कौतुकास्पद असे होते.
अशा व्यक्तिमत्वावर बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची वेळ आली होती. गडहिंग्लज मधील माजी नगरसेविका शुभदा पाटील व तीचा साथीदार राहुल राऊत यांच्या त्रासाला कंटाळून संतोष ने स्वतः व आपल्या पत्नी मुलासह जीवन संपविले. गडहिंग्लज हे शहर सुसंस्कृत आहे. या घटनेमुळे गडहिंग्लज शहराच्या प्रतिमेला काळिमा फसला गेला आहे. या घटनेमुळे शिंदे यांच्या संपूर्ण कुटुंब उध्वस्थ झाले आहे. त्यांची वयोवृद्ध आई फक्त हयात आहे. त्यांच्या वयाचा व एकूण परिस्थितीचा विचार करता दोषींवर कठोर कारवाई व्हावी. हा तपास CBI कडे देऊन CBI नै तपास करावा योग्य ते न्याय मिळावा व आपण योग्य न्याय द्याल हीच अपेक्षा.