गडहिंग्लज : महाराष्ट्र शासनाच्या सदर्भीय पत्रानुसार कृषि व तंत्रशिक्षण विभागाच्या सन २०२३ - २०२४ मधील पवेश प्रक्रिया हि २४ जुन २०२३ पासून सुरू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने स्थानिक दैनिक वृतपत्र मध्ये याची प्रसिध्दी देऊन संस्थेमध्ये सुरू असलेल्या कृषि व तंत्रशिक्षण विभागाच्या कोर्स बाबतची माहीती तसेच सन २०२३-२४ मधील विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र तयार करूण सदरील माहीत देण्यास सुचना केली आहे.. त्यानुसार शमनजी ग्रुप ऑफ इन्स्टिटयुट मधील ज्योतिर्लिंग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रोशनवी शमनजी कृषि महाविद्यालय बहिरेवाडी के रोशनबी शमनजी नर्सिंग स्कुल तसेच रियाजभाई शमनजी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, गडहिंग्लज, यशवंत रेडेकर औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, नेसरी येथे गडहिंग्लज, आजरा, चंदगड या तालुक्यातील स्थानिक विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ. रियाजभाई शमनजी यांनी सदर कोर्ससाठी महाराष्ट्रातून विद्यार्थांची जास्तीची पसंती असल्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांनी प्रथम प्रवेश घेण्याचे अहवान केले आहे, तसेच या सर्व महाविद्यलया ठिकाणी प्रवेश अर्ज भरून देण्यासाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद उपलब्ध करूण दिलेली आहे त्याचाही स्थानिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असेही अहवान केले.
तरी आपणास विनंती की महाराष्ट्र शासनाच्या कृषि व तंत्रशिक्षण विभागाच्या सन २०२३ २०२४ मधील पवेश प्रक्रियेबाबत सन २०२३ - २०२४ मधील विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र बहिरेवाडी (आजरा), नेसरी, शेंद्री (गडहिंग्लज) येथे सुरू केले बाबत, तसेच शमनजी ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट मधील सुरू असलेल्या विविध कोर्स ची माहीती स्थानिक विद्यार्थ्यांना व पालकाना समजावी म्हणून स्थानिक दैनिक वृतपत्र तसेच इलेक्ट्रॉनिक मिडीया यांना दि. ३०.०६.२०२३ वारः शुक्रवार रोजी शमनजी ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट बहिरेवाडी येथे सकाळी ठिक ११.०० वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून आपण या पत्रकार परिषदेस उपस्थीत राहून आम्हास सहकार्य करावे ही विनंती.