गडहिंग्लज :गडहिंग्लज बस स्थानक अर्थात बस डेपो स्वच्छ सुंदर बस स्थानक या उपक्रमांतर्गत गडहिंग्लज बस स्थानकास साई शिक्षण समूहतर्फे गीजवणे याचाकडून डस्टबिनचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद कोल्हापूर सतीश पाटील,गोड साखर कारखान्याचे संचालक प्रकाश भाई पताडे, युवक अध्यक्ष राष्ट्रवादी राकेश पाटील,चंद्रकांत जागनुरे गोड साखर कारखान्याचे माजी संचालक चंद्रकांत जागनुरे तसेच एसटी खात्यातील डेपो मॅनेजर गुरुनाथ रेणे ,राहुल फगरे ,अनिल कुमार पाटील, सुधाकर व्यवहारे ,विठ्ठल कुरणे वरिष्ठ लिपिक रणजीत रोकडे व एस टी डेपोतील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सदरचा कार्यक्रम पार पडला.ह्यावेळी साई शिक्षण समूहाचे आभार मानण्यात आले.