आजरा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आजरा तालुका कार्यकारिणीची बैठक पार पडली. यामध्ये राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून नाका तेथे शाखा" व "गाव तेथे पदाधिकारी" असे अभियान राबविणार असल्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. कोल्हापूर संपर्क अध्यक्ष जयवंत लांडगे, जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या सूचनेनुसार महिला पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाल संपल्यामुळे कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. लवकरच महिला राज्याध्यक्षा व संपर्क अध्यक्ष लांडगे, चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. या बैठकीला उपजिल्हाध्यक्ष सुधीर सुपल, तालुकाध्यक्ष अनिल निऊंगरे, तालुका सचिव चंद्रकांत सांबरेकर, तालुका उपाध्यक्ष आनंदा घंटे, सुशांत पोवार, महिला तालुकाध्यक्षा सरिता सावंत, उपाध्यक्षा तेजस्विनी देसाई, खारघर उपाध्यक्ष अरविंद घेवडे, विद्यार्थी सेना जिल्हाउपाध्यक्ष अश्विन राणे, तालुकाध्यक्ष वैष्णव दळवी, गडहिंग्लज शहराध्यक्ष केंपाना कोरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.