मुश्रीफांना ११ जुलैपर्यंत दिलासा कायम

KolhapurLive

मुंबई : ईडीच्या रडावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापुरातील वजनदार नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे सत्र न्यायालयाने अटकपूर्वी जामीन फेटल्यानंतर मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन दाखल केलेला अटकपूर्व जामीनसाठी अर्जाची न्यायमूर्ती अनुजा प्रभू देसाई यांनी सुनावणी करताना यापूर्वी अटकेपासून दिलेले संरक्षण कायम ठेवले पुढील सुनावणी 11 जुलैला होणार आहे. ४० कोटी रुपयांच्या आर्थिक अफरातफर प्रकरणात मुडगूड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याशी संबंधित मुश्रीफ यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळताना अटकेपासून केवळ तीन दिवसाचे संरक्षण दिले आहे.