हलकर्णीला डॉ. व्हासकोटी यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

KolhapurLive

हलकर्णी : डॉ. गंगाधर व्हसकोटी यांचे गोरगरिबांना आधार देण्याचे काम अनेक वर्षापासून सुरू आहे,असे पंचायत समिती माजी सभापती अमर चव्हाण यांनी सांगितले हलकर्णी येथील राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष डॉ. गंगाधर व्हसकोटी व नौकूडचे सरपंच शुक्राचार्य चौथे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अध्यक्ष रमाप्पा कारागिरी होते. स्वागत प्रसाद जोशी यांनी केले. प्रस्ताविक जि. प. माजी सदस्य जयकुमार मुन्नोळी यांनी केले जयसिंग चव्हाण उद्योजक शिवकुमार ससूद्दी, रवींद्र अस्वले शुक्रचार्य चोथे यांनी मनोगत व्यक्त केले.अमानुल्ला मालदार यांनी आभार मानले यावेळी इकबाल काझी, बाबुराव चौगुले, बी के पाटील ,राजेंद्र मनोळी, रामलिंग दुद्यागोळ, आप्पासाहेब टोनपी, अल्ताफ मुल्ला यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.