कोटा अकॅडमी येथे आरोग्य तपासणी शिबिर

KolhapurLive


डॉ. नागेश पट्टणशेट्टी संचालित कोटा अकॅडमी गडहिंग्लज सेंटर येथील मुलांसाठी आरोग्य शिबिर संपन्न झाले.दोन महिन्यातून एकदा अकॅडमीतील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्यची तपासणी करून उपचार मोफत करण्यात येतात. विद्यार्थ्यांचे आरोग्य व्यवस्थित राहावे व तो विद्यार्थी सक्षमपणे अभ्यास करावा या हेतूने यांची आरोग्य तपासणी केली जाते .अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. नागेश पट्टणशेट्टी यांनी दिली. यावेळी विद्यार्थ्यांचे रक्तगट, हिमोग्लोबिन, याचीही तपासणी केली.या शिबिराचा लाभ ११ वी च्या ७२, नीट,जेईई व रिपीटर बॅचच्या १८ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. डॉ. राजश्री पट्टणशेट्टी,डॉ. राहुल कामते डॉ.रतन हळीज्वाळे, भैरू परीट, सुधाकर खोराटे यांनी आरोग्य तपासणी केली.