प्रा. विश्वजीत कुराडे सेट परीक्षा उत्तीर्ण

KolhapurLive
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचे प्रा. विश्वजीत अनिलराव कुराडे हे पुणे विद्यापीठाच्या वतीने घेतलेल्या सेट परीक्षेत उत्तीर्ण आले. प्रा. विश्वजीत कुराडे सध्या अध्यापनाबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून डॉ. चनशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. संशोधन करत आहेत. प्रा.विश्वजीत कुराडे यांना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, उपाध्यक्ष अँड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, केमिस्ट्री विभाग प्रमुख डॉ. ए.एम. हसुरे, पी.आर.ओ. प्रा. विक्रम शिंदे, रजिस्ट्रार डॉ. संतोष शहापूरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.