मोहन नाव सांगून हिंदू महिलेला फसवलं, मुस्लिम धर्म स्वीकारण्याची जबरदस्ती, मेहरबानला पोलिसांनी केली अटक

KolhapurLive

मोहन असं नाव सांगून हिंदू मुलीची फसवणूक करणाऱ्या आणि तिचं धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर सक्ती करणाऱ्या मेहरबान नावाच्या मुस्लिम तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशातल्या मुरादाबाद रेल्वे स्टेशनवरुन मेहरबान हुसैनला अटक करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मेहरबानने त्याचं आधारकार्डही मोहन नावाने तयार केलं होतं.

मुरादाबादमधल्या रामपूरच्या भोट गावात एका हिंदू मुलीला एका मुस्लिम तरुणाने त्याचं नाव मोहन असल्याचं सांगितलं. आपण हिंदू आहोत हे तिला भासवलं त्यानंतर त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. जेव्हा या महिलेला समजलं की मोहनचं खरं नाव मेहरबान आहे तेव्हा तिने त्याच्याशी असलेले संबंध संपुष्टात आणले. मात्र मेहरबानने तिच्यावर मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती केली. मेहरबान हुसैन हा महिलेला कलियर शरीफ या ठिकाणी घेऊन चालला होता त्याचवेळी या मेहरबानला अटक करण्यात आली.

भोट गावात राहणारा एक तरुण ज्याने हिंदू महिलेला स्वतःचं नाव मोहन आहे असं सांगितलं होतं. त्याचं नाव मेहरबान आहे. तो या हिंदू महिलेचा पाठलाग करत होता. जेव्हा या महिलेला समजलं की मोहनचं खरं नाव मेहरबान आहे आणि तो मुस्लिम आहे तेव्हा तिने दोघांमध्ये असलेले संबंध संपुष्टात आणले. त्यानंतर मेहरबानने या महिलेला धर्मांतर करण्यासाठी धमकावलं. या मुलाने मोहन नाव असलेलं आधारकार्डही बनवून घेतलं होतं. आम्ही या मेहरबानला अटक केली आहे.