शिवराज महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन उत्साहात संपन्न

KolhapurLive

येथील शिवराज महाविद्यालयात समाजशास्त्र विभागाच्यावतीने 'शिवस्वराज्य दिन 'संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रतिमापूजन शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या डॉ. जे. पी. नाईक सभागृहात दुर्गवीर प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित दुर्गचित्रांचे प्रदर्शनाचे उदघाटन प्रा. सौ. बिनादेवी कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्शवत इतिहास आजच्या तरुणांना समजणे काळाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेली गडकोट किल्ले ही खऱ्याअर्थाने स्फुर्तीस्थळे आहेत त्यांचे जतन झाले पाहिजे. दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरु असलेल्या या संवर्धन मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी होऊन छत्रपती शिवरायांचे कार्य समजून घेऊया असे आवाहन डॉ. अनिल कुराडे यांनी केले. दुर्गवीर प्रतिष्ठानचे अवधूत येडूरकर यांनी आजच्या तरुणांनी गड-किल्ल्यांना भेटी देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास समजून घेतले पाहिजे. त्यांच्या महान कार्यांची आठवण आजही गड-किल्ल्यांच्या माध्यमातून जपली गेली आहे. तरुणानी, गड-किल्ल्याच्या संवर्धन कार्यात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी बीड विभाग प्रमुদ विद्यार्थ्यांना केले.डॉ.ए.एम.हसुरे, विना-अनुदानित विभागाच्या 'अॅकेडेमिक डायरेक्टर' डॉ.आर. एस. निळपणकर, डॉ. एस. डी. सावंत, डॉ. आर. पी. हेडगे, पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले, पी.आर.ओ. विक्रम शिंदे.. दुर्गवीर प्रतिष्ठानचे स्वयंसेवक रोहित कातोरे, मनीष हसुरकर, प्रशांत पत्ताडे, संयोजक सौरभ पाटील, गीतेश कुलकर्णी, मयूर केसरकर, पंकज किल्लेदार, गायत्री कांबळे, यामिनी मोरे यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.श्रद्धा पाटील यांनी केले.