गडहिंग्लज : बहिरेवाडी येथील रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालय येथे सोमवारी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे सचिव लक्ष्मण कंगराळकर यांच्या हस्ते रोप पूजन केले. प्रास्ताविक प्रा. एम. डी. माळी यांनी केले. यावेळी वड, पिंपळ, उंबर, नारळ, बेल, कडुलिंब, चिंच, चंदन, बाभुळ आदी भारतीय वृक्षांची माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. रियाजभाई शमनजी व सुलोचना रेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पाडला. सूत्रसंचालन श्रीधर पाटील व समृद्धी कांबळे या विद्यार्थ्यांनी केले. यावेळी प्रा. एस. एस. देसाई प्रा. व्ही. एस. कानडे, प्रा. जेऊर, प्रा. आरमान शमनजी यांच्यासह अन्य प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.