लोकशाहीपासून राज्य दूर चाललंय
“एक-एका मंत्र्याकडे दहा पंधरा खाती आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. पालिकेत नगरसेवक नाहीत. मग महाराष्ट्र चालवतंय कोण? कोणी सुपरमॅन नाहीयेत या जगात. एक आयुक्त संपूर्ण शहर चालवतोय. एवढ्या नगरसेवकाचं काम एकच माणूस करतोय. जिल्हा परिषदेची जबाबदारी एकाच माणसावर आहे. येथे व्यवस्थापन अशक्य आहे. सातत्याने सत्ता एकाच ठिकाणी केंद्रीत ठेवणं म्हणजे लोकशाहीपासून दूर राज्य चाललंय हे दिसतंय”, अशीही टीका सुळेंनी धारेवर धरले. आज त्यांनी मुंबई पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.
तर त्यांना आमचे नंबर द्या
दरम्यान, शिंदे गटाच्या कथित वेलविशरकडून काही दिवसांपूर्वी सलग दोन दिवस मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा पाढा वाचणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. या जाहिरातीवरून वादळ उठल्यानंतर या जाहिराती आमच्या हितचिंतकाने दिल्या असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिली होती. यावरूनही सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला आहे. “या जाहिरातीचे वेलविशर कोण आहेत, याचा आम्ही शोध घेतोय. दादालाही मी याचा शोध घ्यायला सांगितला आहे. दादा आता जळगावला गेला आहे, तिथे त्याला सांगितलं बघ तिकडे तरी आहे का वेलविशर. मी काल पुण्यात होते. तिथेही शोधला. आज बऱ्याच दिवसांनी मुंबईत आलेय. आजची मिटिंग झाली की हा वेलविशर कोण आहे ते शोधणार आहे. असे वेलविशर आपल्या पक्षालाही मिळाले पाहिजेत. माध्यमांना फूल पेज जाहिराती मिळाल्या तर तुमचं आणि आमचं दोघांचंही भलं होईल. असे वेलविशर कोणी असतील तर त्यांना माझा, जयंत पाटील किंवा अजित दादांचा नंबर द्या”, अशी मिश्किल टिप्पणीही सुप्रिया सुळेंनी यावेळी केली.