शिवराज इंग्लिश मेडियम स्कूलच्या प्रशासकीय प्रमुखपदी श्री ए.बी. पाटील यांची निवड

KolhapurLive


गडहिंग्लज : येथील शिवराज इंग्लिश मेडियम स्कूलच्या प्रशासकीय प्रमुखपदी श्री ए.बी. पाटील यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांच्या हस्ते श्री ए.बी. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्था सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी या संस्थेने विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नेहमी प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगून हे विद्या संकुल ग्रामीण व गरीब विद्यार्थ्यांना घडविणारे आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा विकास घडविण्यासाठी येथील प्रत्येक घटकाचे मोलाचे सहकार्य लाभते त्यामुळे शिवराज विद्या संकुल आज नावारूपास आले आहे. प्रत्येकांनी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडणे आवश्यक आहे तसेच शिवराज इंग्लिश मेडियम स्कूलही विद्यार्थीभिमुख व गुणवत्ताधारक विद्यार्थी घडविणे आवश्यक असल्याचेस्पष्ट करून श्री पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी स्वागत व प्रास्ताविक प्रा. एम. के. नोरेंज यांनी केले. श्री शरद कांबळे सर यांनी शाळेच्या उपक्रमाचा आढावा घेतला. प्रशासकीय प्रमुख श्री ए. बी. पाटील यांनी या शाळेला नावारूपास आणण्यासाठी तसेच गुणवत्तापूर्ण व संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी श्री तानाजी कुराडे, प्रा. सौ. बिनादेवी कुराडे, मुख्याध्यापिका सौ. गौरी शिंदे यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते.