गडहिंग्लज:- मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष निर्माते तसेच मुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त गडहिंग्लज येथील कमते हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले.
यावेळी 65 रुग्णांनी याचा लाभ घेतला, यातील 3 रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून बाकी रुग्णांना तपासणी करून औषधे देण्यात आले आहे.
हे शिबीर शिवसेना वैद्यकीय कक्ष आणि कमते हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आले होते.
जिल्हा अध्यक्ष शिवसेना वैद्यकीय प्रशांत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुका प्रमुख संजय संकपाळ, उपविभागीय समनव्यक शिवसेना वैद्यकीय महेश भादवणकर, कमते हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी राहुल मासोले, सचिन राठोड, विशाल चौगुले, आदि उपस्थित होते.