गडहिंग्लज : नगरपालिकेच्या वतीने ५ टक्के दिव्यांग निधीचा लाभ घेण्यासाठी नगर पररिषद हद्दीतील दिव्यांग व्यक्तींना युडीआयडी कार्ड आवश्यक आहे. कोणत्याही शासकीय अथवा खाजगी यंत्रणेस दिव्यांग ओळखपत्र देण्याचे अधिकार शासनाने दिलेले नाही. याची दिव्यांग बांधवांनी नोंद घेणे आवश्यक आहे.नगरपरिषदेकडील निधीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रासह ३१ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी केले आहे. यापूवी सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. तसेच विहीत मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.