काळभैरी डोंगरावरील जागा जि. प.ला देण्याचा ठराव

KolhapurLive


गडहिंग्लज : डोंगरातील श्री काळभैरी मंदिर परिसराचा विकास आणि पर्यटन वाढीच्या दृष्टीने मंदिर परिसरात असणारी वनविभागाची एक हेक्टर जागा जिल्हा परिषदेला देण्याचा ठराव ग्रामपंचायतीने केल्याची माहिती सरपंच बाजीराव खोत यांनी दिली. मंगळवारी झालेल्या ग्रामसमेत हा ठराव करण्यात आला.

दरम्यान, मंगळवारच्या ग्रामसभेत सुरुवातीस उपस्थितांचे स्वागत ग्रामसेवक संदीप तोरसकर यांनी केले. यावेळी जलयुक्त शिवार आराखडा, विविध अहवाल या विषयानंतर डोंगरातील काळभैरी येथी मंदिर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे देवू नये असा देखील ठराव करून ग्रामस्थांनी देवस्थान समितीच्या विरोधात वज्रमूठ  आवळली

डोंगरातील काळभैरी मंदिर परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करायचा आहे. त्यामुळे विकासासाठी मंदिर परिसराची जागा जिल्हा परिषदेला देण्यासाठी ठराव ग्रामसभेत केला. यावेळी ग्रामसेवक संदीप तोरसकर, उपसरपंच रविंद्र बनगे यांच्यासह सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.