चंदगड : चंदगड शहराच्या विकासासाठी आमदार राजेश पाटील यांच्या शिफारशीनुसार शासनाकडून १५१.७५ लाखांचा फंड उपलब्ध झाला. परंतु चंदगड नगरपंचायतीने बदली प्रस्ताव करून पाहुण्यांच्या काजू कारखान्याकडे फंड लावल्याची तक्रार नगरसेवक बाळासाहेब हळदणकर यांनी नगरविकास विभाग मुंबई यांच्याकडे केली आहे.
चंदगड शहरातील विविध विकासकामांसाठी आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नाने १५१.७५ लाखाच्या मंजूर निधी मंजूर झाला. हा शासनाचा निधी असून या फंडामधील नगराध्यक्ष यांनी जिथे घरे नाहीत, अशा ठिकाणी पाहुण्यांच्या काजू कारखान्याकडे निधी लावला.
या फंडाची कागदपत्रे पूर्तता सार्वजनिक बांधकाम विभागाला दयावी. कागदपत्रांची पूर्तता न केल्यास व काम न चालू झाल्यास दि. २७ जून २०२३ रोजी नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.