आज लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्समध्ये सामना होणार आहे. मात्र त्याआधी एक घटना घडलीय. मुंबई इंडियन्सचा बॉलर अर्जुन तेंडुलकरला कुत्रा चावला आहे. स्वत: अर्जुनने या बद्दल माहिती दिलीय. लखनौच्या इकाना स्टेडियमवर अर्जुन LSG च्या खेळाडूंना भेटत होता, त्यावेळी त्याने हा खुलासा केला. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सचा भाग आहे.
लखनौ सुपर जायंट्सने सोशल मीडियावर एका व्हिडिओ शेयर केलाय. त्यात अर्जुन तेंडुलकर LSG चे दोन प्लेयर्स युद्धवीर सिंह चरक आणि मोहसीन खानला भेटताना दिसतोय. या दरम्यान दोघांशी बोलताना त्याने कुत्रा चावल्याची माहिती दिली.
कुत्रा अर्जुन तेंडुलकरला कधी चावला? या प्रश्नावर, त्याने एकदिवस आधी असं उत्तर दिलं. अर्जुनची विचारपूस केल्यानंतर युद्धवीर सिंह आणि मोहसीन खानने त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला. कुत्रा अर्जुनच्या डाव्या हाताला चावला. व्हिडिओमधून हे स्पष्ट होतं. कुत्रा चावल्याच निशाण त्याच्या हातावर आहे. पण घाव इतका गंभीर नाहीय. कारण दुखापत गंभीर असती, तर तो नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसला नसता.